Popular Posts

Wednesday, January 9, 2013

Durgveer mhanje kay ?दुर्गवीर म्हंटल कि गडकोट.wmv

Friday, November 2, 2012

धन्य धन्य


धन्य धन्य जाहले जीवन आमुचे ...



मी जन्मलो मराठी...


त्या उपरी कळस म्हणोनी,


मी वाढलो मराठी...


सोनियाचा कळस जणू तो...


कि मी भेटलो दुर्गवीरांसी..


धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/
http://dhirajloke.blogspot.in/
 

Tuesday, September 11, 2012

प्रेम अधूर.....


प्रेम अधूर राहील खंत नाही,
कारण त्याच्या आठवणीना कधी अंत नाही....
तू आठवत नाहीस अस म्हणू नकोस,
पण त्याच्या आठवणीतहि कुढत बसू नकोस....
हुंदक्यातील त्याचा श्वास,
होईल जणू तोच असल्याचा भास....
तुझ कोमल, हळवं, निरागस मन,
आता थोड कणखर कर....
वाईट भूतकाळाला दूर लोटून,
भविष्याला जवळ कर....
विस्क ट ले ल्या प्रश्नां सारख,
आयुष्य विस्कटू देऊ नकोस....
अनमोल अश्या ह्या आयुष्याची,
योग्य अशी घडी बसवून ठेव...
धिरज लोके (दुर्गवीर चा  धीरु )

Wednesday, July 18, 2012

शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था चोख!!

शहाजी महाराजांनी वसविली रविवार पेठ.

बाळाजी कुलकर्णी यांच्यावर 1654 मध्ये सोपविली होती जबाबदारी

पुणे- "व्यापारी पेठ' म्हणून वर्षानुवर्षे आपली ओळख जपणारी पुण्यातील "रविवार पेठ' वसविण्याबाबत शहाजी महाराज यांनीच कौल दिला होता. त्यानंतर "मलकापूर' म्हणजेच आजच्या "रविवार पेठ'ची निर्मिती झाली. हा इतिहास उलगडला आहे खुद्द शहाजी महाराज यांनी 1654 मध्ये लिहिलेल्या एका अप्रकाशित पत्राद्वारे.

इतिहास अभ्यासक भास्वती सोमण यांना पेशवे दफ्तर येथे हे पत्र नुकतेच प्राप्त झाले. याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी अंबाजी पाठक यांना इंदापूर येथील "इनाम' दिल्यासंदर्भातील एक पत्रही त्यांना मिळाले आहे.

इ. स. 1654 मध्ये शहाजीराजांनी पुण्यातील बाळाजी हरी कुलकर्णी यांना मलकापूर पेठेचे "कुळकर्ण'; तसेच मलकापूर पेठ वसवायचा कौल (परवानगी) दिल्यासंबंधीचे हे पत्र आहे. मलकापूर ही पेठ इतकी जुनी असल्याचे या पत्रावरून प्रकाशात आले आहे. "हे कौलनामा अजरख्तखाने महाराज राजे श्री शहाजी राजे दाईम दौलतहू ता बाळाजी हरी कुलकर्णी पेठ मलकापूर पो पुणे' अशा आशयाने शहाजी महाराजांनी आपल्या पत्राचा प्रारंभ केला आहे. या पत्रामध्ये बाळाजी हरी कुलकर्णी यांनी ही पेठ वसविण्यासाठी वीस होन एवढी रक्कम सरकारात जमा करावी, असेही नमूद केले आहे; तसेच येथे प्रजा आणून पेठेची वसाहत करण्याची जबाबदारी कुलकर्णी यांची असल्याचे या पत्रात म्हटले आहे. पुणे 1716 मध्ये पुन्हा स्वराज्यात आले. 1730 नंतर पुण्याची वस्ती वाढत गेली. पुणे स्वराज्यात नसताना जे भाग उजाड झाले होते, ज्या ठिकाणची वस्ती कमी झाली होती, ते भाग नव्याने वसविण्यात आले. त्यानुसार दीक्षित-पटवर्धन यांनी मलकापूर पेठेच्या जागी पेठ वसविली. ती "रविवार पेठ' या नावाने आजही ओळखली जात असल्याचे सोमण यांनी सांगितले.

इंग्रजांच्या दप्तरी नोंद
"शिवाजी महाराजांचे पत्र 1650 चे असून, इंदापूर येथील आंबाजी पाठक यांना इनाम दिल्यासंदर्भातील आहे. त्यामध्ये जमीन; तसेच त्या भागातील जकातीच्या उत्पन्नातील काही भाग दिल्याचे व तत्कालीन काही कर माफ असल्याचा उल्लेख आहे. इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर इंग्रजांनी स्वतःच्या दप्तरी असावीत म्हणून अनेक महत्त्वाची पत्रे लोकांकडून मागवून घेतली; तसेच त्यांची व्यवस्थित नोंद करून घेतली. सदर दोन्ही पत्रे ही त्याच प्रकारच्या नोंदींमधील असून पत्रांच्या प्रती तंतोतंत जुळल्यासंबंधी तत्कालीन इंग्रजी अधिकाऱ्यांच्या पत्रांखाली स्वाक्षऱ्याही आहेत,'' असे सोमण यांनी सांगितले.

माहिती साभार - राजेंद्र बेंद्रे

Monday, July 16, 2012

किल्ले अर्नाळा...



निसर्गाचा विलोभनीय अविष्कार म्हणजेच किल्ले अर्नाळा...


सेवेच्या ठाई तत्पर... दुर्गवीर निरंतर...


जय शिवराय!!


दुर्गवीर प्रतिष्ठान!!


"दुर्गवीर चा धीरु" 

Durgaveer Pratishthan